ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली !

पुणे – मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर या दिवशी शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता; मात्र या मोर्च्याला पुढे जाण्यासाठी पोलिसांकडून अनुमती नाकारण्यात आली. तेव्हा मोर्च्याचे नेतृत्व करणार्‍या माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.