बेंगळुरू येथे ६२ वर्षीय पुजार्‍याकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार

प्रसारमाध्यमांनी हे वृत्त ठळकपणे प्रसारित केले; मात्र जेव्हा मौलवी, पाद्री यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते, तेव्हा हीच प्रसारमाध्यमे ती वृत्ते दडपून स्वतःचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देतात !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील देवाणहल्ली परिसरात एका ६२ वर्षीय पुजार्‍याने एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. वेंकटरामणप्पा असे आरोपीचे नाव आहे. तो मंदिरात पुजारी आहे. आरोपी देवाणहल्ली परिसरात रहाणार्‍या त्याच्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. वेंकटरामणप्पा याचा जावई चौडेश्‍वरी मंदिरात पुजारी आहे. जावई शहराबाहेर गेलेला असल्याने वेंकटरामणप्पा मंदिरातील नित्य पूजा करण्याच्या साहाय्यासाठी मुलीकडे आला होता. वेंकटरामणप्पा घरात असतांना त्याला घराच्या परिसरात खेळणारी मुलगी दिसल्यावर त्याने तिला बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. (सरकारने बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)