नाशिक येथील फादर रुडी यांच्यावर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार

हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक कृती किती पर्यावरणपुरक आहे, हे यावरून लक्षात येईल !

नाशिक – येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले. त्यानंतर येथील एका कब्रस्थानात त्यांच्या अस्थींचे दफन करण्यात आले.