काश्मीर खोर्‍यामध्ये ३५ वर्षांनंतर हिंदूंनी काढली धार्मिक मिरवणूक !

यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये ३५ वर्षांनंतर हिंदूंकडून धार्मिक मिरवणूक काढण्यात आली. याविषयीचा व्हिडिओ मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘३५ वर्षांनंतर पहिल्यांदा काश्मीर खोर्‍यामध्ये हिंदूंनी धार्मिक मिरवणूक काढली.

या मिरवणुकीमध्ये हिंदू ढोल, नगाडे, मंजिरी आदी वाजवत रस्त्यावरून ‘हरे रामा हरे कृष्णा’, असे म्हणत टाळ्या वाजवत जात आहेत. एका मोठ्या गाडीवर देवतांची चित्रे आणि मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या मिरवणुकीला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही दिसत आहे.