बीजिंग (चीन) – गेल्या ३ मासांपासून येथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमध्ये चीन सरकारने काही काळासाठी सूट दिल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढून तणाव निर्माण झाला आहे.
हुबेई आणि जियांगशी प्रांताला जोडणार्या पुलावर पोलिसांनी नागरिकांना जियांगशीमध्ये जाण्यापासून रोखल्याने तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या संदर्भातील ‘व्हिडिओ’ही प्रसारित झाला आहे. यात ‘काही संतप्त नागरिक ओरडून जियांगशी प्रांतामध्ये जाणारी प्रवेशद्वारे उडण्याची मागणी करत आहेत, तसेच संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या गाड्याही उलटवल्या आहेत’, असे दिसत आहे.