दळणवळण बंदी असतांनाही तेलंगण येथे चारचाकीतून फिरणार्‍या तरुणाला अटक

नियमांचे उल्लंघन करून स्वतःसह जनतेचे आरोग्य धोक्यात आणणार्‍यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !

सायबराबाद (तेलंगण) – येथील पोलिसांनी दळणवळण बंदी असतांनाही चारचाकी वाहनातून फिरणार्‍या एका २० वर्षीय तरुणाला अटक करून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. ‘हा तरुण खोकत असल्याचे आढळून आल्याने त्याला या केंद्रात पाठवण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले. हा तरुण ५ दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातून भारतात परत आला होता. नियमानुसार परदेशातून आल्यावर १४ दिवस घरी रहाणे आवश्यक असतांना तो बाहेेर फिरत होता.