मुंबई – प्रभादेवी येथील कॉर्पोरेट कार्यालयाजवळ खाद्यपदार्थांचे दुकान चालवणार्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेला ताप येऊन घशाला खवखव येत होती. तिला पडताळणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आल्यावर महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळले. मुंबई महापालिकेच्या एका अधिकार्याने ही माहिती दिली.