विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध असलेले ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यात भारतियांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले !

  • कोरोनाचा असाही एक दुष्परिणाम ! विवाहबाह्य संबंध संकल्पना ही धर्मशास्त्रानुसार चुकीची कृती असून असे करणे पापच आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध निर्माण न होण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
  • पाश्‍चात्त्य विकृतीचा आणखी एक दुष्परिणाम ! आज विदेशात कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊन त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पाश्‍चात्त्य विकृतीचा दुष्परिणाम जाणून सरकार आणि प्रशासन यांनी अशा ‘अ‍ॅप’वर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी !

नवी देहली – देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच केंद्र आणि अनेक राज्य शासन यांनी ठिकठिकाणी संचारबंदी किंवा जमावबंदी केली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना घरून काम करण्याची सोय नसल्याने अनेक जण इंटरनेटच्या साहाय्याने वेळ घालवत आहेत. या सर्वांमध्ये विवाहबाह्य संबंधांसाठी लोकप्रिय असलेले ‘ग्लीडेन’ या ‘डेटिंग अ‍ॅप’ आस्थापनाने पत्रकाद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून नागरिक घरी रहायला लागल्यापासून आस्थापनाचे ‘डेटिंग अ‍ॅप’ डाऊनलोड करणार्‍या भारतियांची संख्या ७० टक्क्यांनी वाढली आहे.

‘ग्लीडेन’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीत पुढे म्हटले आहे की,

१. गेल्या काही दिवसांपासून आमच्या संकेस्थळावर गप्पा मारण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच खासगी आणि सार्वजनिक या दोन्ही प्रकारांमध्ये छायाचित्रे अपलोड करण्याचेही प्रमाणही वाढले आहे.

२. वर्ष २०१७ पासून भारतामध्ये ‘ग्लीडेन’ सेवा पुरवत असून ८ लाख भारतीय त्याचा लाभ घेत आहेत.

३. इटलीमध्येही ग्लीडेनचा वापर वाढला आहे. आमच्या संकेतस्थळावर येणार्‍यांची संख्या ३०० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच इटलीमधील युझर्स सामान्यपणे सरासरी २ घंटे आमच्या संकेतस्थळावर असायचे, आता तो वेळ ३ घंट्यांपर्यंत झाला आहे. फ्रान्स आणि स्पेन येथेही ‘लॉकडाऊन’ झाल्याने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.