गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनुभवलेली ‘सनातन प्रभात’ची लोकप्रियता !

‘सनातन प्रभात’ हे संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असलेले एकमेवाद्वितीय नियतकालिक आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला अयोध्येत आली.

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत.

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

दर्शन घेऊन घरी येण्यास निघतांना श्री. म्हाळंक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व नीट होईल.’’ तेव्हा ‘जणूकाही परात्पर गुरु डॉक्टरच आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला आश्वस्त करत होते’, असे आम्हाला जाणवले.

गुरुकृपेने संत वडील लाभल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे !

Goa Spiritual Festival 2024 : सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्यामुळे गोव्याची पुरातन संस्कृती विश्वभर पोचत आहे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी. त्यामुळे आध्यात्मिक गोवा हे स्वप्न साकार होणार, हे नक्की ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी

संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.

गोवा : अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भेट

गोवा राज्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख आणि दिशा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले अन् केलेली कार्यवाही यांचा आलेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदित केला.

एका स्त्री संतांचे घरी आगमन झाल्यावर साधिकेने अनुभवलेली त्यांची प्रीती आणि कृपा !

घरात सर्वत्र प्रकाश पसरला असून घर व्यापक आणि मोठे झाले आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही सर्व जण भावावस्थेत होतो. सर्वांचे मन देवीच्या चरणी एकाग्र झाले होते.स्त्री संतांची ओटी भरतांना माझ्या मनामध्ये भाव दाटून आला होता.

१४ फेब्रुवारीला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’ !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.