श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात संबंधितांची ‘नार्को’ चाचणी करावी !

श्री तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने, मौल्यवान वस्तू आणि ७१ पुरातन नाणी प्रकरणात अन्वेषण चालू आहे. सदरचे दागिने हे ८ व्या शतकातील आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अंतर्गत रिक्त पदे भरतांना धाराशिव जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्या ! – शिवबाराजे प्रतिष्ठान

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून रिक्तपदे भरण्यासाठी विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

४५ दिवस होऊनही मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसारच !

श्री तुळजाभवानीदेवीच्या प्राचीन मौल्यवान दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणात २० डिसेंबर २०२३ या दिवशी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

श्री तुळजाभवानी मंदिर २२ घंटे खुले रहाणार !

श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढली असल्यामुळे मंदिर २२ घंटे खुले रहाणार आहे. नाताळ, नवीन वर्ष इत्यादी सलग सुट्यांमुळे ही संख्या वाढली आहे. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मंदिर २२ घंटे खुले असेल.

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंदवल्यानंतर महंत चिलोजीबुवा पोलिसांना कसे सापडले नाहीत ? त्यांना अटक का करण्यात आली नाही ? ते पसार कसे झाले ? त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? आदी प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंद होताच आरोपी पसार होणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना काय पकडणार ?

श्री तुळजाभवानीदेवीचे प्राचीन दागिने गहाळ केल्याच्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा नोंद !

मृतांवर आता गुन्हा नोंदवून काय उपयोग ? प्रशासनाने या सर्वच कारवाईला विलंब केला. मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय !

श्री तुळजापूरच्या देवीचा सोन्याचा मुकुट गायब झाल्याच्या प्रकरणी पोलीस तक्रार नोंद करण्याची सूचना देऊ ! –  देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्री तुळजापूर येथील भवानीदेवीचा प्राचीन १ किलो सोन्याचा मुकुट गायब, दुर्मिळ दागिन्यांच्या वजनांमध्ये तफावत याविषयी तत्काळ आदेश देऊन ती तक्रार नोंद करण्यास सांगतो, असे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये १९ डिसेंबर या दिवशी सांगितले. याविषयी आमदार महादेव जानकर यांनी औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते.  सौजन्य झी … Read more

श्री भवानीदेवीचा गायब झालेला सोन्याचा मुकुट सापडला !

सरकारी झालेल्या मंदिरांतील सोन्या-चांदीचे दागिने हरवणे, मंदिरांच्या भूमी ‘गायब’ होणे, मंदिरांत भ्रष्टाचार होणे, त्यांची संपत्ती लुटणे आदी सर्व मंदिरांच्या सरकारीकरणाचेच दुष्परिणाम आहेत ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असण्यासाठी भक्तांनी आग्रही राहिले पाहिजे !