|

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री भवानीदेवीचा गायब झालेला सोन्याचा मुकुट सापडला असल्याचा दावा सोने मोजणी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला. श्री तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकुट सापडल्याचे सांगण्यात येत आहे. ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट गायब झाला असल्याचे मोजणी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते; मात्र तोच मुकुट आता सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. तथापि मंदिर प्रशासनाकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सौजन्य न्यूज 18 लोकमत
वर्ष २००९ ते २०२३ या कालावधीत श्री भवानीदेवीला भाविकांनी वाहिलेले सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तू यांची मोजणी काही दिवसांपूर्वी मंदिर संस्थानकडून करण्यात आली होती. त्यामध्ये २७ अलंकारांपैकी ४ अलंकार गायब असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामध्ये मंगळसूत्र, ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट यांचाही समावेश होता. ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकुट ठेवण्यात आला असल्याचीही माहिती मिळाली होती.
संपादकीय भूमिका
|
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !