धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिंदे याने १० लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यातील ६ लाख रुपये घेतांना त्याला अटक करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत ‘सैनिक स्कूल’चे भितींचे कुंपण आणि इतर कामाचे शासकीय देयक काढण्यासाठी त्याने लाच घेतली.
१. तक्रारदार हा शासकीय कंत्राटदार असून त्याला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे, तसेच प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी ८८ लाख रुपयांचे कंत्राट मिळाले होते. संबंधित बांधकामाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
२. शिंदे याने या बांधकामाच्या आतापर्यंतच्या २ कोटी रुपयांहून अधिक देयकांची पडताळणी करून त्यांना संमती मिळवून दिली. तसेच उर्वरित देयक पडताळणी करून संमतीसाठी पाठवणे आणि अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणून भरलेली ३४ लाख ६० सहस्र ५७९ रुपये परत मिळवून देण्यासाठी शिंदे याने पंचासमक्ष १० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ६ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करून रक्कम स्वीकारतांना त्याला अटक करण्यात आली.
लाचेची रक्कम देण्यासाठी संपर्क क्रमांक !लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने कुणी खासगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास (०२४७२) २२२८७९ अथवा ‘टोल फ्री’ क्रमांक १०६४ यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. |
संपादकीय भूमिका
|