वणीत खाणीतून कोळसा चोरणार्‍या १० दरोडेखोरांना अटक !

वणी (यवतमाळ), १२ फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत १३ दरोडेखोरांनी २ ट्रक घेऊन दहशत निर्माण करत कोळसा लुटला. त्यानंतर शिरपूर पोलिसांच्या साहाय्याने वणी पोलिसांनी १० दरोडेखोरांना अटक करून दोन्ही हायवा ट्रक जप्त केले. ३ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या वेळी दरोडेखोरांनी सुरक्षा गार्डच्या अंगावरही ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.