वीजचोरी केल्याप्रकरणी ३ कारखान्यांना ८४ लाख ८४ सहस्र रुपयांचे वीजदेयक आकारले !

वीजचोरी केलेल्यांना दंडासमवेत कठोर शिक्षा होणेही आवश्यक आहे !

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या ८ घटना उघडकीस !

पकडल्या जाणार्‍या चोरांवर तत्परतेने कठोर कारवाई होत नसल्यामुळे चोरांचे फावते !

संभाजीनगर येथे बैलांच्या चोर्‍यांमुळे शेतकरी हवालदिल !

गेले काही वर्षे शेतकर्‍यांच्या गायी चोरीला जात होत्या; आता बैलही चोरीला जात आहेत. चोर कोण आहेत ?, हे पोलिसांना माहीत नसेल असे नाही. पोलिसांना ठोस कारवाईच करायची नाही, हे सत्य आहे !

हिंगोली येथे चोरट्यांनी वैद्यकीय अधिकार्‍याचे घर फोडून २ लाख ८४ सहस्र रुपयांचा माल पळवला !

शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षारक्षकांचा वावर असतांनाही वैद्यकीय अधिकार्‍यांच्या घरात चोरी होत असेल, तर शहरातील सर्वसामान्य लोकांची घरे सुरक्षित असतील का ?

पुणे येथे मौजमजेसाठी दुचाकी गाड्या चोरणार्‍या टोळीला अटक !

मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍यांवर संस्कारही नाहीत आणि कायद्याचा धाकही नाही, हे गंभीर आहे.

शहागड येथील बुलढाणा अर्बन पतसंस्था लुटणार्‍या दोघांना २४ घंट्यांत अटक !

जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे.

बुलढाणा येथील केळवद स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा !

चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.