सातारा येथे २ चोरट्यांना पोलिसांनी केली अटक !

सातारा, १० जून (वार्ता.) – येथील करंजे पेठेत चोरीचा प्रयत्न करणार्‍या २ चोरांना कह्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. बशीर शेख आणि ईश्वर भोरे असे कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ५ जूनच्या पहाटे ३ वाजता अज्ञात चोरांना करंजे पेठ येथे चोरीचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अन्वेषण चालू केले. ६ जून या दिवशी संबंधित चोर माजगावकर माळ येथे रहाणारे आहेत, असे समजल्यावर पोलिसांचे पथक तात्काळ येथे पोचले. गेल्यावर चोरांनी पोलिसांना पाहून चोरांनी पळ काढला. पोलिसांनी दोघांना पकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा मान्य केला. आरोपींकडून एक मोटारसायकल शासनाधिन करण्यात आली आहे.