सातारा येथे पत्रपेटीची चोरी !

असुरक्षित सातारा !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १० जून (वार्ता.) – अनेक वर्षांपासून येथील प्रतापगंज पेठेतील वीजवितरण कार्यालयासमोर असणार्‍या पत्रपेटीची अज्ञात चोरांनी चोरी केली आहे.

बँका, पतसंस्था, विविध कार्यालये आदी प्रतापगंज पेठेत असल्यामुळे येथे पत्रपेटी अत्यावश्यक आहे. या पत्रपेटीच्याच चोरीमुळे आता नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. याविषयी बाळकृष्ण गायकवाड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हेगारांचे अन्वेषण चालू केले आहे.