मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन यांचे दौरे रहित !

अहिल्यानगरमध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघा’च्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते

गोवा : संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे स्थानांतर

महाविद्यालय परिसरात श्री सरस्वती पूजन करण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर हे स्थानांतर झालेले आहे. प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो यांना म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पुन्हा पाठवण्यात आले आहे.

वाचनाने अनुभवविश्व विस्तारते ! –  उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

पुस्तक वाचनाने आपले अनुभवविश्व विस्तारते, सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रेरणादायी ठरते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण माने यांचा विशेष सत्कार

मानेसरांच्या अलोरे कारकीर्दीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या एकूण अनुमाने ९ सहस्र विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी आजही त्यांच्या थेट संपर्कात आहेत.

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळावा, यासाठी पालकांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात भरवली शाळा

जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून, एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्‍या शाळेत पाठवून वेळ मारून नेली जात आहे !

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर मसुरे केंद्र शाळेत शिक्षक देण्याचे प्रशासनाचे आश्वासन

प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा एकदा स्पष्ट !

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे झाराप येथील शाळेत शिक्षक देणे अशक्य !

सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! आंदोलन केल्यानंतरच समस्येवर उपाययोजना काढणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?

पुण्‍यातील नामांकित शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेसह विद्यार्थ्‍यांवर गुन्‍हा नोंद

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यामध्‍ये मुख्‍याध्‍यापिका आणि विद्यार्थी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करावा लागणे, हे दुर्दैवी आहे.

शिक्षक म्‍हणून नेमतांना सरकार त्‍यांची प्रमाणपत्रे पहाते का ?

‘साखळी (गोवा) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्‍पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्‍याच्‍या प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्‍या आईने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.’