तालिबानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ किंवा विधान करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणार ! – मध्यप्रदेश शासन

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची हा अभिनंदनीय निर्णय आहे. वास्तविक असा आदेश केंद्र सरकारनेच देणे आवश्यक आहे आणि ज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचे समर्थन केले आहे, त्यांना तात्काळ अटक करून कारागृहातही टाकले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

आरोग्यमंत्री विश्‍वास सारंग

भोपाळ (मध्यप्रदेश) – सामाजिक माध्यमांतून तालिबानचे समर्थन करणारी ‘पोस्ट’ कुणी प्रसारित केली किंवा विधाने केली, तर त्याच्या विरोधात राज्यशासन कठोर कारवाई करील, अशी चेतावणी राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वास सारंग यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री सारंग यांनी म्हटले की, तालिबानचे समर्थन करणारी ‘पोस्ट’ आणि विधाने करणे दुर्दैवी आहे. यावर सरकार लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. लांगूलचालनाचे राजकारण या राज्यात आणि देशात चालणार नाही.