गोव्यात शिकत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या भवितव्याविषयी चिंतेचे वातावरण

गोवा विद्यापिठ

पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) – अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता संपादन केल्याने गोव्यात शिकत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांना अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या भवितव्याविषयी चिंता वाटत आहे. या विद्यार्थ्यांच्या मते अफगाणिस्तानमधील लोकांचा तालिबानी सत्तेला पाठिंबा नाही. गोवा विद्यापिठात अफगाणिस्तानमधील काही विद्यार्थी शिकत आहेत. हे विद्यार्थी एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला म्हणाले, ‘‘तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता संपादन केल्यानंतर तेथील लोकांमध्ये भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमधील माजी शासकीय कर्मचार्‍यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानला आता भारत आणि इतर देशांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.’’ वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना मुलाखत देणार्‍या विद्यार्थ्यांचा चेहरा लपवण्यात आला होता.