तालिबानकडून अशी आशा करणे मूर्खपणाचे आहे, हे तेथे सध्या घडत असलेल्या त्यांच्या क्रौर्यावरून तरी श्रीलंकेच्या लक्षात यायला हवे ! जगातील १-२ देशांच्या व्यतिरिक्त अशी आशा कुणीही व्यक्त करत नसतांना श्रीलंकेला तालिबानवर इतका विश्वास केवळ श्रीलंकेला साहाय्य करणार्या चीनमुळे आला आहे का ? असा प्रश्न पडतो ! – संपादक
कोलंबो (श्रीलंका) – अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर तालिबान सामान्य जनतेला क्षमा करणे, महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणत्याही विदेशी नागरिकाला हानी न पोचवणे, या त्याच्या आश्वासनांवर आम्ही खुश आहोत. आम्हाला आशा आहे की, तो या आश्वासनांवर कायम राहील, अशा शब्दांत श्रीलंकेने तालिबानच्या राजवटीचे स्वागत केले आहे.
१. श्रीलंकेने म्हटले की, अफगाणिस्तानमधून तिच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, भारत, पाक आणि संयुक्त राष्ट्रे यांच्याकडे साहाय्य मागण्यात आले आहे.
२. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वीच श्रीलंकेला सतर्क केले होते की, त्याने तालिबान सरकारला मान्यता देऊ नये. प्रत्येकाला भीती आहे की, तालिबानी सरकारच्या काळात अफगाणिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या गटांचे केंद्र बनेल. त्यामुळे श्रीलंकेने त्याच्याशी संबंध तोडले पाहिजेत.