छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत वाहने जाळणारे धर्मांध २ मित्र अटकेत !

यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्‍ये कैद झाले. अन्‍वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.

शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस

कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या हानीविषयी हानी टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांचे  निर्बिजीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आद्यशंकराचार्यांनी चारही दिशांना पीठाधिशांना नेमून अद्वैत तत्त्वज्ञानाची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवली ! – प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे

आद्यशंकराचार्य यांनी केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून ४ दिशांना केलेली मठांची स्थापना, असे असाधारण कार्य केले.

महाराष्ट्रासाठी बारसू येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची आमची सिद्धता आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल.

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून दिल्या जाणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून यावर कार्यवाही होणार आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता कायम !

प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक हे संस्था गटातून, तर अमल महाडिक हे ऊस उत्पादक गटातून विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी महाडिक गटातील सर्व उमेदवार हे आघाडीवर होते.

गोव्यात वर्ष २०१४ पासून १०२ सरकारी प्राथमिक शाळा बंद

वर्ष १९७८ पासून मागील ३५ वर्षांत ३८४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शासकीय माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये राज्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या.

गोवा : काणकोण मामलेदार कार्यालयातील आगीत अनेक जुनी कागदपत्रे जळून खाक

राज्यात हल्लीच अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. भूमी बळकावल्याची प्रकरणे आणि आग दुर्घटना यांचा काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.

गोवा : गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून वगळा !

गुन्हेगारी सूचीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याची कृती ही त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि हे दु:खद आहे. श्री. हनुमंत परब यांनी मागील अनेक वर्षे समाजात जे चांगले कार्य केले आहे, त्या कार्याचा हा अवमान आहे.

बालविवाहाला उपस्‍थित राहिल्‍यास २ वर्षांच्‍या कारागृहासह १ लाख रुपयांचा दंड ! – जिल्‍हाधिकारी, अमरावती

मागील ३ मासांत अमरावती जिल्‍ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्‍या जिल्‍हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ११ बालविवाह थांबवण्‍यात आले आहेत. यंत्रणा दक्ष नसती, तर कदाचित् हे विवाह झाले असते.