विश्व हिंदु परिषदेने विझवला श्रीजानाई-मळाई डोंगरावरील वणवा !

खिंडवाडी गावचे आराध्यदैवत श्रीजानाई-मळाईदेवीच्या डोंगरावर अचानक वणवा लागला होता. तब्बल ५ घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा वणवा विझवण्यात यश मिळाले.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी फरशीवर ‘कूल कोट’ देण्यात येणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे येतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मंदिर परिसरात फिरतांना भाविकांच्या पायाला चटके बसतात.

राज्यातील ७५ शहरांमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड होणार !

आधुनिक औषधे उपलब्ध नसतांना भारतात वनस्पतींद्वारे होत असलेले परंपरागत औषधोपचार औषधी वनस्पती नष्ट झाल्यामुळे बंद झाले आहेत. अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची महाराष्ट्रात पुन्हा लागवड करण्यात येणार आहे.

राज्यातील ७५ धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणार बेल उद्यानाची निर्मिती !

राज्यातील ७५ धार्मिक स्थानांच्या ठिकाणी ‘बेल वन उद्यान’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाच्या वनविभागाने घेतला आहे. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यशासनाकडून याविषयी घोषणा करण्यात आली होती.

मदरशाच्या नावाखाली अवैध बांधकाम : कार्ला (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचेे उपोषण !

ग्रामस्थांना असे उपोषण करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! अवैध बांधकाम होऊ देणार्‍या आणि ते निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे !

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

मंदिराच्या पर्यवेक्षक म्हणून एकही हिंदु व्यक्ती उपलब्ध होऊ नये, याविषयी हिंदूंनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे !

मुंबई-गोवा मार्गावरील हातीवले (राजापूर) येथील टोलवसुली पुन्हा बंद !

मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानंतर हातिवले येथील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. टोलनाक्यावर देण्यात आलेले पोलीस संरक्षणही हटवण्यात आले आहे.

अनिल परब यांना १९ एप्रिलपर्यंत उच्च न्यायालयाचा दिलासा

मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम अवैधपणे करण्यात आले आहे. तसेच या बांधकाम प्रकरणी केंद्रशासनाच्या पर्यावरण नियमांचेही उल्लंघन करण्यात आल्यामुळे परब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘सनबर्न’सारख्या संगीत महोत्सवाला मान्यता देण्यासाठी यापुढे संयुक्त विशेष विभाग !

‘सनबर्न’ महोत्सवासाठी घाईगडबडीने अवैधरित्या संमती देण्यात आली. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची हमी राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

कळंगुट परिसरातील दलालांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

असे पर्यटनमंत्र्यांना विचारावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !