छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत वाहने जाळणारे धर्मांध २ मित्र अटकेत !

चित्रणानुसार दुचाकीवरून २० दिवसांपासून शोध !

सी.सी. कॅमेऱ्यात दिसलेले आरोपी

छत्रपती संभाजीनगर – किराडपुरा दंगलीत पोलिसांची १४ वाहने जाळण्‍यात अग्रेसर राहिलेल्‍या धर्मांध २ मित्रांचा विशेष अन्‍वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) २० दिवसांच्‍या अन्‍वेषणानंतर शोध लावला. सय्‍यद जुहूर सय्‍यद मोहीम (वय २४ वर्षे) आणि सय्‍यद इलियास सय्‍यद नाजेर (वय २३ वर्षे) अशी त्‍यांची नावे असून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

३० मार्च या दिवशी रात्री उसळलेली दंगल थांबवण्‍यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात एकाचा मृत्‍यू झाला; मात्र तोपर्यंत नियंत्रणाबाहेर गेलेला जमाव मंदिरावर चालून जाण्‍याचा प्रयत्न करत होता. दगडफेकीसह काही प्रमुख धर्मांध दंगेखोरांनी पोलिसांची १२ वाहने जाळली. मंदिराच्‍या बंदोबस्‍तासाठी आलेल्‍या २ पोलीस कर्मचार्‍यांची खासगी दुचाकी जाळल्‍या होत्‍या.

प्रतिकात्मक चित्र

घरापासून लांब राहिले !

७९ दंगेखोरांना अटक केल्‍यानंतर वाहने पेटवलेल्‍यांचा शोध चालू करण्‍यात आला. त्‍यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्‍ये कैद झाले. अन्‍वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. दंगलीनंतर दिवसा ते घरापासून लांब रहाण्‍यावर भर देत होते. दोघेही हातगाडी चालवतात. न्‍यायालयाने त्‍यांना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

पोलिसांची वाहने जाळून दहशत माजवणार्‍या धर्मांधांना आजन्‍म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !