विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
२९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली.
२९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली.
किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करणार्या शिवप्रेमींचे अभिनंदन ! जे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या लक्षात येते, ते प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? प्रशासन गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?
अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.
काँग्रेसने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यास ठाम विरोध केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या २ पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील.
जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे.
‘कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँके’च्या ६ संचालक प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौर्यावर गेले असता २ लाख ४६ सहस्र रुपये व्यय आला आहे. याविषयी चौकशी करून १५ दिवसांत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले आहेत.
पुरोगामी चळवळीत काम करणार्या विविध संघटनांची ‘जिल्हा सेवा समिती’ नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय झाला.
वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे.
राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पर्यटकांच्या मेजवान्या कोणी होऊ दिल्या ? पोलीस आणि प्रशासन यांनी या पर्यटकांकडून कोरोनाविषयीच्या नियमावलीचे पालन का करून घेतले नाही ?
गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते.