मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २७ नोव्हेंबरला देहली येथे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनमध्ये भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ५९ व्या गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याविषयी निमंत्रण दिले.

बी.एच्.आर्. पतसंस्था घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या धाडी

ठेवीदारांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलीस यांकडे या घोटाळ्याप्रकरणी ३ गुन्हे नोंद आहेत. अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील येथील घरी धाड टाकण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन !

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (तालुका-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६० वर्षे) यांचे २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना निवडून आणा ! – संजय केळकर, आमदार, भाजप

श्री. संग्राम देशमुख आणि श्री. जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ गावभाग येथील हरिदास भवन येथे पदवीधर शिक्षकांसाठीच्या मेळाव्यात ठाण्याचे भाजप आमदार श्री. संजय केळकर बोलत होते.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून देशापुढे आदर्श निर्माण करावा !- राज पुरोहित, भाजपचे नेते

हिंदूंचा वंशविच्छेद करणार्‍या या षड्यंत्राचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात तत्परतेने कडक कायदा व्हायला हवा !

राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका  ! –  उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल-उद्धव ठाकरे

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या महाग प्रकल्पाचा फेरविचार करावा – आशिष शेलार

निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारण्याचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत; मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तियाला अटक

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी धाडी टाकल्या.

मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका ! – प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीचे आयुक्तांना निवेदन

प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप

६० वा गोवा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपयांच्या साहाय्याची मागणी !

गोवा राज्य ६० वा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० पासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे गोवा आणि देशभर गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन सर्वांना घडवले जाणार आहे.