जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भाजप शासनाच्या काळात राज्यात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनियमितता आहे, असे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी अहवालात म्हटले होते.

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्साहात

८ मासांनंतर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहाने कार्तिक पौर्णिमा साजरी झाली. अनेक दत्त भक्तांनी मंदिर परिसरात दीप लावल्यामुळे तो उजळून गेला होता. दुपारी ३ वाजता पवमान सुकृत पठण केले. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य पडताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा शासनाचा आदेश

राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक पडताळणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही पडताळणी कशा प्रकारे करावी, याविषयीचा अहवाल या समितीने नुकताच शासनाकडे सादर केला आहे.

कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण !

३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.

मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणी युवकांवर गुन्हा नोंद

मुलींना पळवून नेल्याच्या २ प्रकरणांत कुडाळ तालुक्यातील एक आणि शेर्ले, सावंतवाडी येथील एक, अशा २ युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

म्हादई नदीच्या उपनद्यांचे अस्तित्व धोक्यात : शासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी

म्हादई आणि तिच्या उपनद्या गोव्यातील लोकांच्या जगण्याचा आधार बनल्या आहेत. कर्नाटकातील कळसा, भंडुरा, हलतरा, तसेच इरती, बैल, मुदूरहल, पानशेरा या उपनद्यांच्या अस्तित्वावर धरणांच्या साखळीने घाला घातला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा ! – रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस, भाजप

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (जिल्हा बँकेचा) कारभार पहाता बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ‘ऑडिट पॉईंट’ असतांना चुकीच्या पद्धतीने नोकरभरती चालू आहे.

घोटाळ्याच्या प्रकरणी माजी गोवा राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

या सनदी अधिकार्‍यांनी त्यांच्या कारकीर्दीत घोटाळा केला असेल, तर तेही शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !