पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) गोवा राज्याचे माजी निवडणूक आयुक्त आर्.के. श्रीवास्तव आणि त्यावेळचे देहली येथील सहकार सोसायटीचे उपनिबंधक पदम दत्त शर्मा यांना देहली येथील गुन्हे अन्वेषण न्यायालयाने घोटाळ्याच्या प्रकरणी २ वर्षांचा सश्रम कारावास आणि ३५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. बनावट कागदपत्रे सादर करून बंद पडलेली राधाकृष्ण सहकारी ग्रुप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चालू केल्याविषयीचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे, तसेच या प्रकरणी सुभाष चंदर, मयांक गोस्वामी आणि अश्वनी शर्मा या ३ व्यक्तींना ४ वर्षांचा सश्रम कारावास आणि वेगवेगळ्या रकमेच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (या सनदी अधिकार्यांनी त्यांच्या कारकीर्दीत घोटाळा केला असेल, तर तेही शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी ! – संपादक)