उत्तरप्रदेशात आता ८ वीपर्यंतचे विद्यार्थी आठवड्यातून एकदा दप्तराविना जाणार !

तरुण पिढीला खर्‍या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी तिच्यावर साधनेचा संस्कार करून ती करवून घेणे आवश्यक आहे.

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रविष्ट केलेले खटले मागे घेणार ! – शासनाचा निर्णय

राज्यातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या वेळी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने २ डिसेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाकडे अर्ज

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने ४ डिसेंबर या दिवशी विशेष ‘पीएम्एलए’ न्यायालयाकडे केली आहे. त्यांची संपत्तीही कह्यात घेण्याची अनुमती अंमलबजावणी संचालनालयाने मागितली आहे.

कोल्हापूर येथील जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या बंदीवानाची कारागृहात हत्या

कारागृहात हत्या होत असतील, तर कारागृह प्रशासन नावाची काही गोष्ट आहे कि नाही, असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?

शिवमोग्गा येथे धर्मांधांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही ! – कर्नाटकचे मंत्री ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण

कर्नाटकने नियम धाब्यावर बसवून म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवले !

म्हादई पाणीतंट्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट असतांनाही कर्नाटक शासनाने म्हादई नदीचे पाणी वळवणे चालूच ठेवल्याचा दावा ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.

एल्विस गोम्स यांची ‘आम आदमी’ पक्षाला सोडचिठ्ठी

पक्षाचे माजी समन्वयक एल्विस गोम्स यांनी ‘आम आदमी’ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. या समवेतच पक्षाचे माजी महासचिव प्रदीप पाडगावकर आणि ‘आप’चे अनेक कार्यकर्ते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले.

गोव्यात खाणी पुढील ६ मासांत चालू होऊ शकतात! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण न झाल्यास गोव्यातील खाणी पुढील ६ मासांत चालू होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

गोवा फाऊंडेशनसह पर्रा ग्रामस्थांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाची सरकारला नोटीस

पर्रा गावासाठी अधिसूचित केलेला बाह्यविकास आराखडा रहित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापनदिन ३ डिसेंबरला राज्यात ‘आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरां’चे आयोजन करण्यात आले होते.