पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा होणार कायापालट

संभाजीनगर जवळील पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवा, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागारही नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवली न जाणे ही ठाकरे सरकारची नाचक्की ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सरकारची पूर्वसिद्धता नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली. ही ठाकरे सरकारची नाचक्कीच आहे. आज न्यायालयात पुन: पुन्हा तीच तीच सूत्रे मांडली गेली. न्यायालयापुढे सरकारी अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी कोणतीही नवीन सूत्रे मांडले नाहीत….

ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला शिर्डी संस्थानने लावलेल्या फलकाचे रक्षण करणार !

शिर्डी संस्थान यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व साई भक्तांनी स्वागत केले आहे, असे असतांनाही काही विकृती त्यांचा विरोध करत आहेत. शिर्डी येथे जाऊन फलक काढण्याची भाषा करत आहेत. शिर्डी संस्थानच्या समर्थनार्थ तसेच तेथे लावलेल्या फलकाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला त्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून थांबतील….

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे स्थानांतर तात्काळ रहित करण्याची मागणी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले आहे. त्यांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती, तसेच नियमानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्थानांतर ३ वर्षे करता येत नाही.

कुजिरा, बांबोळी संकुलातील शिक्षिका कोरोनाबाधित : विद्यालयाचे नियमित वर्ग रहित

कुजिरा, बांबोळी संकुलातील ‘मुष्टीफंड विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय’मधील एक शिक्षिका कोरोनाबाधित झाली आहे. यामुळे विद्यालयाचे इयत्ता १० आणि १२ वीचे नियमित वर्ग १२ डिसेंबरपर्यंत रहित करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात अचानक पडलेल्या पावसाने आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ डिसेंबरला काही ठिकाणी अचानक पाऊस पडला. सकाळपासूनच वातावरणात पालट जाणवत होता, तसेच उष्णताही वाढली होती. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन दिल्याने अ‍ॅलोपॅथीवर  परिणाम होत असल्याचा गोव्यातील डॉक्टरांचा दावा !

केंद्रशासनाने ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना गोव्यातील डॉक्टरांनी विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या या प्रयत्नांचा निषेध करणारे एक निवेदन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या गोवा विभागाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे.

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनात सहभागी व्हा ! – मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी

देशाच्या रक्षणार्थ अनेक सैनिकांनी त्यांचे प्राण पणाला लावून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. काहींनी स्वत:च्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंगेश जोशी यांनी केले.

हॉटेल व्यावसायिकाकडून स्थानिकांना वागातोर समुद्रकिनार्‍यावर मज्जाव

वागातोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने वागातोर समुद्रकिनार्‍याचे नाव ‘सनबर्न बीच’ असे ठेवण्यासमवेतच या समुद्रकिनार्‍यावर अंजुना, कायसुव आणि वागातोर येथील स्थानिक नागरिकांना प्रवेश नाकारला आहे.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे ९ डिसेंबरला पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.