… अन्यथा उत्तरदायी अधिकार्‍यांपैकी कुणालाही सोडणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालयाची अन्वेषण यंत्रणांना चेतावणी

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आणखी किती काळ तुमचे अन्वेषण चालू रहाणार ? कर्नाटक राज्यात यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्येचे खटलेही चालू झाले. आपल्या राज्यात अद्याप खटले का चालू झाले नाहीत ?

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती !

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाला ‘कॅबिनेट’ मंत्रीपदाचा दर्जा आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नियंत्रण कक्षातून नागरी सुविधा केंद्रात स्थानांतर

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादात अडकलेले मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष १ मध्ये स्थानांतर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी !

एम्.पी.एस्.सी. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला. एम्.पी.एस्.सी. हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते, त्यामध्ये एम्.पी.एस्.सी. कुठेतरी कमी पडली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम्.पी.एस्.सी.) परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार असल्याचे आयोगाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे. यापूर्वी १४ मार्च या दिवशी होणारी ही परीक्षा रहित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता.

महाआघाडी सरकारचा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा आहे ! – नारायण राणे, नेते, भाजप

महाआघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा बनावट असून यात केवळ आकड्यांची हेराफेरी करण्यात आली आहे. हा जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी १२ मार्च या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत असल्याचे खोटे सांगणार्‍या पुणे येथील तोतया पोलिसाला अटक

आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करतांना पोलिसांनी  प्रतीक भावसार या तरुणाला अटक केली.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल !

अद्यापही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही; पण ‘ती जाऊ नये’, असे वाटत असेल, तर कोरोनाविषयक बंधने पाळणे आवश्यक आहे. येत्या दिवसांमध्ये राज्यातील काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल.

पुणे येथील अवैध हज हाऊसचे प्रकरण : हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा कडाडून विरोध !

कोंढवा खुर्द येथे ‘अ‍ॅमेनिटी स्पेस’च्या जागेवर ‘सिव्हीक कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर’ या गोंडस नावाखाली होत असलेल्या अनधिकृत हज हाऊसला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे.

परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ राज्यभर एम्.पी.एस्.सी.चे विद्यार्थी रस्त्यावर !

कोरोनाच्या कारणावरून १४ मार्च या दिवशी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम्.पी.एस्.सी.) परीक्षा रहित करण्यात आल्याने राज्यात पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठा निषेध केला.