सभागृहाचे कामकाज बंद पाडू नये, यासाठी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती दिली – उपमुख्यमंत्री अजित पवार

र्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वीजदेयकाच्या सूत्रावरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजदेयके न भरलेल्या शेतकर्‍यांची वीजजोडणी तोडण्याला स्थगिती दिल्याचे १० मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमांसह सुंदर सजावट !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांसह शेवंती आणि बेल पत्रांची सुंदर सजावट करण्यात आली होती. श्री. अनंत कटप या भाविकाच्या वतीने ही सजावट करण्यात आली होती. 

नागपूर शहरात एक आठवडा ‘दळणवळण बंदी’ लागू ! – पालकमंत्री नितीन राऊत यांची घोषणा

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ११ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले !

गेल्या १ मार्चपासून चालू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे १० मार्च या दिवशी सूप वाजले. पुढील अधिवेशन ५ जुलै या दिवशी मुंबई येथे घेण्यात येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घोषित केले.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले !-अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांचा आरोप

मनसुख हिरेन प्रकरण आणि अन्वय नाईक प्रकरणांत वेगवेगळा न्याय कसा ? या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांचा सी.डी.आर्. पुरावा काढला होता. फडणवीस मुख्यमंत्री असतांना आमच्या वडिलांनी आत्महत्या केली.

मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण हटवा; अन्यथा शिवसेना पद्धतीने ते हटवू ! – शिवसेनेची चेतावणी

कुंडाच्या ठिकाणी शिवसेनेने केलेल्या आंदोलनात चेतावणी देण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

गुजरातमधील काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी ११ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी २० मिनिटे चर्चा केली.

यवतमाळ येथील ‘महिला उत्थान मंडळा’च्या वतीने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना निवेदन !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच ते ८ वर्षांपासून कारागृहात असून विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

कोरोनाचे संकट असतांना १ मार्चपासून आमदारांचे वेतन पूर्ववत् !

आमदारांचा निधी ४ कोटी रुपये केला ! – अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, राज्य आर्थिक संकटात असतांना लोकप्रतिनिधींचे वेतन वाढवणे कितपत योग्य ?

वाझे यांचे गुन्हे शाखेतून स्थानांतर करणार ! – गृहमंत्री

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळामुळे जनतेच्या पैशांतून चालणार्‍या सभागृहाचा वेळ वाया घालवणे कितपत योग्य ? अशांकडून जनहितार्थ कार्याची अपेक्षा कशी करता येईल ?