धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना युवकांनी पिटाळले !

ख्रिस्ती मिशनरी लोकांना धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करत होते. याला स्थानिक आदिवासी युवकांनी विरोध केला, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी दिली .

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर (जिल्हा सांगली) बंद !

रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणीवर बळजोरीने संजय गेळे आणि अश्विनी गेळे या पती-पत्नीने ख्रिस्ती धार्मिक विधी केल्याचा प्रकार केला होता. गेळे दांपत्यांनी केलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर २५ डिसेंबरला बंद ठेवण्यात आले.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदे करावेत, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

सानपाडा (नवी मुंबई) येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळांची भजन स्पर्धा पार पडल्या !

नवविधी भक्ती सेवा समितीच्या वतीने सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्र येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन स्पर्धांचा कार्यक्रम पार पडला. नवविधी भक्ती सेवा समितीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजा, दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

बलात्काराच्या आरोपाप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांची एस्.आय.टी.द्वारे चौकशी करा !

स्वतःकडील अधिकाराचा वापर करत सरकारला निर्देश दिले आहेत, असे सभापती नीलम गोर्‍हे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभापतींचे निर्देश मान्य करून शेवाळे यांची चौकशी करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी राज्यशासन गंभीर आहे. राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !

शिवसेनेच्या मूळ कार्यालयाची जागा शिंदे गटाकडे, तर ठाकरे गटासाठी नवीन कार्यालय !

सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची स्थापना !

या सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठांकडून ठाणे बंद, फेरी काढून केला निषेध व्यक्त

शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि संत यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठाणे बंदची हाक दिली होती.