इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

हिंदु युवती-महिला यांची लक्षणीय उपस्थिती !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदे करावेत, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्याला राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून प्रारंभ झाला असून मुख्य मार्गावरून हा मोर्चा गांधी पुतळा येथे विसर्जित करण्यात आला. या मोर्च्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ‘व्हिजन इचलकरंजी’ यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे सहस्रो कार्यकर्ते सर्वकाही विसरून एक हिंदु म्हणून उपस्थित होते. मोर्च्यात हिंदु युवती-महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती.