पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्‍यांविषयी मी त्‍यांची भेट घेणार आहे.

पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्यासमवेत काय झाले, हे त्यांना सांगीन, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी शिवसेनेचे रस्ता बंद आंदोलन !

कोल्हापूर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा, हानीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ५० सहस्र रुपये द्यावे यांसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) कोल्हापूर-सांगली रस्त्यावर शिरोली येथे ७ नोव्हेंबरला रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

पंजाबमधील अन्य हिंदु नेत्यांना ठार मारण्याची पाकमधील खलिस्तानवाद्यांची धमकी

पंजाबमधील हिंदूंच्या नेत्यांना वेचून ठार करण्याचा कट गेल्या काही वर्षांपासून रचला जाऊन त्यानुसार त्यांना ठारही करण्यात येत असतांना राज्यातील पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून निष्क्रीयताच दाखवण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांना हुतात्म्याचा दर्जा द्यावा ! – सूरी यांच्या मुलाची मागणी

४ नोव्हेंबर या दिवशी एका खलिस्तान्याकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या मुलाने सूरी यांना ‘वीरगतीला प्राप्त’ (हुतात्मा) असा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली.

अमृतसरमध्ये खलिस्तान्यांकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या

सुधीर सूरी यांना पोलीस संरक्षण असतांना आणि मोठ्या संख्येने पोलीस तेथे उपस्थित असतांनाही त्यांची हत्या होत असेल, तर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हिंदूंसाठी चिंताजनक आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे !

शिवसेनेच्या दोन्ही गटांना म्हणणे सादर करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडून १ मासाचा कालावधी !

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी आपला गट ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला आहे.

दीपावलीच्या निमित्ताने राजेश क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ भेट !

दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेला !

भूमी मिळवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेल्याचे समजते. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांना रोजगार मिळणार होता.

माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने पुणे येथे निधन !

मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते.