‘ना टायर्ड हूँँ, ना रिटायर्ड हूँ ।’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला निवृत्त व्हायला सांगत आहेत, त्यावर काय सांगाल?’, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्या वेळी त्यांनी वरील विधान केले.

यापुढे बडव्‍यांची अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍याच भाषेत उत्तर देऊ !

बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्‍यामुळे त्‍यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.

(म्‍हणे) ‘राष्‍ट्रप्रेमी नसलेल्‍यांसमवेत जाणार नाही !’ – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

दंगल घडवून राजकीय लाभ घेण्‍याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्‍ट्रीय ऐक्‍याला तडा देणारे राष्‍ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्‍ट्रप्रेमी नाहीत, त्‍यांच्‍यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बैठकीत घेतली.

तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही  ? – अजित पवार

राज्यात शासकीय नोकरीमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षानंतर, तर केंद्रशासनाच्या नोकरीतून ६० वर्षांनी निवृत्त व्हावे लागते. भाजपमध्ये ७५ वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती घ्यावी लागते. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हे नेते याची उदाहरणे आहेत.

मी पुस्तक लिहीन, तेव्हा शरद पवार महाराष्ट्राला समजतील ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

भविष्यात माझ्यावरही पुस्तक लिहाण्याची वेळ येईल. मी पुस्तक लिहीन, तेव्हा महाराष्ट्राला ‘शरद पवार हे काय आहेत ?’, हे समजेल. त्या वेळी काय काय समजेल, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘शरद पवार यांची सावली’ अशी माझी ओळख होती.

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांना सोडल्यावर त्यांनाही वाईट वाटले असेल ! – छगन भुजबळ, मंत्री, महाराष्ट्र

मी बाळासाहेब ठाकरे यांना सोडले, तेव्हा त्यांनाही वाईट वाटले. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडले, तेव्हा त्यांना आणि पंकजा मुंडे यांनाही वाईट वाटले. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांना सोडले, तेव्हा त्यांनाही वाईट वाटले असेल, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे मूळ राष्‍ट्रवादी काँग्रेसमधून निलंबन !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी ट्‍वीट करून या कारवाईची माहिती दिली आहे. या दोघांवर पक्षविरोधी काम केल्‍याचा ठपका ठेवण्‍यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट : अजित पवार यांच्यासह ९ नेते सरकारमध्ये सहभागी !

सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

(म्हणे) ‘मोदी सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेल्या अप्रसन्नतेवरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव !’ – शरद पवार

देशातील जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अप्रसन्नता आणि अस्वस्थता आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव आणण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र

सरकार स्‍थापन करण्‍याचा प्रयत्न आम्‍ही शरद पवार यांच्‍याशी चर्चा करूनच केला होता. शरद पवार यांनी आमचा उपयोग करून घेतला. रणनीती आखली आणि एकप्रकारे आमची दिशाभूल करून निघून गेले.