मी पुस्तक लिहीन, तेव्हा शरद पवार महाराष्ट्राला समजतील ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

डावीकडून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल

मुंबई – भविष्यात माझ्यावरही पुस्तक लिहाण्याची वेळ येईल. मी पुस्तक लिहीन, तेव्हा महाराष्ट्राला ‘शरद पवार हे काय आहेत ?’, हे समजेल. त्या वेळी काय काय समजेल, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘शरद पवार यांची सावली’ अशी माझी ओळख होती. मी अजित पवार यांच्या पाठीशी आहे. मी अजित पवार यांना पाठिंबा दिला, यावरून जनतेने स्थिती लक्षात घ्यावी, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटाच्या बैठकीत केले.