‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !
‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.
‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.
वर्ष १९७८ मध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीपाती अन् घराणेशाही यांचे वळण मिळाले.
‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि अन्य आमदार यांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या वेळी मंत्रीपदाची शपथ घेतांना छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘आमचा विठ्ठल’ असा केला होता.
भविष्यात हा ‘सैतान’ गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका ‘रयत क्रांती संघटने’चे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली. खोत हे प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलत होते.
‘उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला निवृत्त व्हायला सांगत आहेत, त्यावर काय सांगाल?’, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्या वेळी त्यांनी वरील विधान केले.
बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.
दंगल घडवून राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय ऐक्याला तडा देणारे राष्ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्ट्रप्रेमी नाहीत, त्यांच्यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेतली.
राज्यात शासकीय नोकरीमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षानंतर, तर केंद्रशासनाच्या नोकरीतून ६० वर्षांनी निवृत्त व्हावे लागते. भाजपमध्ये ७५ वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती घ्यावी लागते. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हे नेते याची उदाहरणे आहेत.
भविष्यात माझ्यावरही पुस्तक लिहाण्याची वेळ येईल. मी पुस्तक लिहीन, तेव्हा महाराष्ट्राला ‘शरद पवार हे काय आहेत ?’, हे समजेल. त्या वेळी काय काय समजेल, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘शरद पवार यांची सावली’ अशी माझी ओळख होती.