मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे माजी खासदार सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून या कारवाईची माहिती दिली आहे. या दोघांवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.