पुण्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू होणार

शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून चालू होणार ! – वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच चालू झाले असून येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जानेवारी या दिवशी दिली.

उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना आता ‘गंगा नदी संवर्धन’ विषय शिकवला जाणार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !

राज्यातील शाळा बंद असतांना शाळांसाठी स्वयंपाकघर साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटींची निविदा प्रक्रिया

निधीची चणचण असतांना आणि शाळा बंद असतांना ताटवाटयांची खरेदी कशासाठी ?

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत दुरुस्त करीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही ! – सौ. स्नेहा गवस, सरपंच, झरेबांबर

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही डागडुजी का करत नाही ? जे पालकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का ?

कोरोनाचा प्रभाव उणावूनही शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२ टक्के !

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार उणावला असला, तरी कोरोनाविषयीची भीती अल्प होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे.

इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत.

सोलापूर येथील शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त

येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या ‘डीबी’ (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथकाने १२ वर्षांच्या शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त केली. ही मुले शहरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होती.

उत्तरप्रदेशात १० वीच्या विद्यार्थ्याकडून वर्गातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मित्राची गोळ्या झाडून हत्या

विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

सांगली येथील मोकळ्या भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण उठविण्याचे राज्यशासन आणि महापालिका प्रशासन यांचे कारस्थान ! – विजय नामजोशी

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान या संस्थेस सलग १३ वर्षे मालकी हक्क आणि ताबा असलेली विश्रामबाग येथील भूमी माध्यमिक शाळा म्हणून आरक्षित आहे.