सांगली जिल्‍ह्यातील ४ तालुक्‍यांत मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ घोषित !

सांगली जिल्‍ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या ४ तालुक्‍यांमध्‍ये मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ घोषित केला आहे. या तालुक्‍यात शासनाने संमत केलेल्‍या विविध सवलती लागू करण्‍याविषयीचा आदेश जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केला आहे.

राज्‍यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यास हिंदु एकता आंदोलन विरोध करणार ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

टिपू सुलतानची जयंती जर साजरी करण्‍याचा प्रयत्न झाला, तर हिंदु एकता आंदोलन त्‍याला पूर्ण शक्‍तीनिशी विरोध करेल, असे प्रतिपादन प्रदेशाध्‍यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केले. ते संघटनेच्‍या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते.

हिंदुस्थानचा प्राण मराठा समाजात, शंभर टक्के आरक्षण मिळणार ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी 

कोणताही पक्ष आणि संप्रदाय असला, तरी आपण सर्व हिंदुस्थानचे म्हणून एक आहोत. महाराष्ट्रातील मराठा समाजात हिंदुस्थानचा प्राण आहे. आरक्षणाची समस्या १०० टक्के सुटणार आहे. हे आरक्षणाचे सूत्र लबाड राजकीय लोकांमुळे रेंगाळले आहे….

श्रीमंत पटवर्धन घराणे हे हिंदवी स्‍वराज्‍याचे ‘दक्षिण दिक्‍पाल’ ! – किशोर पटवर्धन, उद्योजक

या कार्यक्रमात श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्‍या जीवनपटावर आधारित व्‍हिडिओ (ध्‍वनीचित्रचकती) दाखवण्‍यात आला. उद्योजक, अभियंता, संगीत दिग्‍दर्शक, तसेच गणपति पंचायतन मंदिराचे सुशोभिकरण आणि विस्‍तार अशा विविध माध्‍यमांतून राजे सरकार यांनी अखंड जनसेवा केली.

‘शासन आपल्‍या दारी’ योजनेच्‍या माहिती पुस्‍तिकेचे वितरण !

मिरज येथील प्रभाग क्रमांक ४ मध्‍ये महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेल्‍या ‘शासन आपल्‍या दारी’ या योजनांची माहिती पुस्‍तिका आणि योजनांची माहिती नागरिकांना भेटून देण्‍यात आली. या प्रसंगी त्‍यांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या.

नागरिक आणि शेती यांसाठी कृष्‍णा नदीच्‍या पात्रात त्‍वरित पाणी सोडण्‍यात यावे ! – आमदार सुधीर गाडगीळ, भाजप

सांगली जिल्‍ह्यातील कृष्‍णा नदीचे पात्र कोरडे पडतांना दिसून येत आहे. सर्व उपसा सिंचन योजना आणि पाणीपुरवठा योजना बंद होण्‍याच्‍या मार्गावर आहेत.

आज सांगली येथे श्रीमंत राजेसाहेब विजयसिंहराजे पटवर्धन आणि श्रीमंत राणीसाहेब पटवर्धन यांचा विशेष सन्‍मान !

सांगली येथे सांगली संस्‍थानचे तत्‍कालीन वारसदार श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्‍साहात नुकताच साजरा करण्‍यात आला.

सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत ‘हेट स्पीच’ प्रकरणी तक्रार प्रविष्ट !

‘हेट स्पीच’ प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी तक्रार मिरज, विटा, ईश्वरपूर, पलूस, तासगाव येथील पोलीस ठाण्यांत प्रविष्ट करण्यात आली.

आपल्याला देवीचे भक्त होऊन आर्ततेने आशीर्वाद मागावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला यावी, यासाठी माझे आयुष्य पणाला लावून काम करण्याची इच्छा आहे.

सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले.