आज सांगली येथे श्रीमंत राजेसाहेब विजयसिंहराजे पटवर्धन आणि श्रीमंत राणीसाहेब पटवर्धन यांचा विशेष सन्‍मान !

मध्यभागी श्रीमंत राजेसाहेब विजयसिंहराजे पटवर्धन आणि श्रीमंत राणीसाहेब पटवर्धन (संग्रहित चित्र)

सांगली, २७ ऑक्‍टोबर (वार्ता.) – सांगली येथे सांगली संस्‍थानचे तत्‍कालीन वारसदार श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्‍साहात नुकताच साजरा करण्‍यात आला. त्‍या अनुषंगाने सांगली येथील समस्‍त ब्राह्मण समाजाच्‍या वतीने २८ ऑक्‍टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता विश्रामबाग येथील ‘खरे क्‍लब हाऊस’ येथे श्रीमंत राजेसाहेब विजयसिंहराजे पटवर्धन आणि श्रीमंत राणीसाहेब सौ. राजलक्ष्मीराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्‍या ‘विशेष सन्‍माना’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या सोहळ्‍याला हिंदवी स्‍वराज्‍यातील समकालीन सरदार घराण्‍यातील, तसेच तत्‍कालीन सांगली संस्‍थानचे सरंजामदार आणि मनसबदार यांचे विद्यमान वंशज श्रीमंत उदयसिंहजी पेशवे (सरकार) यांची प्रमुख पाहुणे म्‍हणून विशेष उपस्‍थिती लाभणार आहे. तरी या सोहळ्‍याला सर्वांनी उपस्‍थित रहावे, असे आवाहन ब्राह्मण समाजाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.