सांगली – सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडतांना दिसून येत आहे. सर्व उपसा सिंचन योजना आणि पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सांगली शहरास २-३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून २ दिवसानंतर सांगलीसह आसपासच्या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिक, शेती आणि पशूधन वाचवण्यासाठी कृष्णा नदीमध्ये वेळोवेळी पाणी सोडणे आवश्यक आहे, यासाठी या संदर्भात संबंधितांना तात्काळ कृष्णा नदीत पाणी सोडण्याविषयी सूचित करावे, अशी विनंती येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.