सांगली – हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारा, हिंदूंची मंदिरे उद़्ध्वस्त करणारा, हिंदूंची हत्या करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या जयंतीवर राज्य सरकारने बंदी घालावी. टिपू सुलतानचे भित्तीपत्रक मुद्रीत करण्यावर बंदी घालावी, तसेच टिपू सुलतानचे राज्यात होणारे उदात्तीकरण थांबवावे. यानंतरही टिपू सुलतानची जयंती जर साजरी करण्याचा प्रयत्न झाला, तर हिंदु एकता आंदोलन त्याला पूर्ण शक्तीनिशी विरोध करेल, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केले. ते संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते.
प्रास्ताविक हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी केले. या प्रसंगी सर्वश्री प्रसाद रिसवडे, श्रीकांत शिंदे, राजू जाधव, शिवाजी पाटील, गोपाळराव माने, रामभाऊ सूर्यवंशी, अजय वाले, सचिन देसाई, राकेश कलकुटगी यांसह हिंदु एकता आंदोलनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.