रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ या वचनाची प्रचीती घेतलेल्या सौ. सोनाली पोत्रेकर !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. त्यानंतर माझ्यात झालेले पालट, मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांविषयांची माहिती पुढे दिली आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

मी सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेली भेट, हे माझ्या कोणत्या जन्मातील पुण्याचे फळ आहे’, हे मला ठाऊक नाही.

पू. नंदा आचारी गुरुजी यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान !

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी घोषित करण्यात आली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमात आल्यानंतर माझ्यात आपोआपच सात्त्विक भाव निर्माण झाला, तसेच माझ्या अंगात आपोआपच एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. येथील साधकांची सेवाभावी वृत्ती पाहून मी प्रभावित झालो.’

‘रामनाथी आश्रम साक्षात् वैकुंठच आहे’, असा भाव असणार्‍या पुणे येथील युवा साधिका !

‘२७.१०.२०२२ या दिवशी मी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी होते. त्या वेळी पुण्याहून चार साधिका युवा शिबिरासाठी आल्या होत्या. त्यांच्यापैकी एक साधिका कु. आकांक्षा घाडगे (वय २२ वर्षे) स्वतःच्या समवेत काही फुले घेऊन आली होती.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील वातावरण आल्हाददायक आहे. असे समाजात कुठेही पहायला मिळत नाही. येथे सर्वत्र आनंद आहे. येथील साधकांचे वागणे सात्त्विक आहे. नामसंकीर्तनाची एक वेगळीच शक्ती आहे, जिला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही. त्या शक्तीचा उपयोग करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो.’

आनंदी, उत्साही आणि हसतमुख सौ. वृंदा वीरेंद्र मराठे !

कार्तिक शुक्ल तृतीया (२८.१०.२०२२) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा वीरेंद्र मराठे यांचा ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये काव्यरूपात पुढे दिली आहेत.

श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा आश्रमात श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या विविध दीपरचनांद्वारे श्री सिद्धिविनायकाची आराधना करण्यात आली. दिव्यांचा लखलखता प्रकाश लक्ष वेधून घेतो.

प्रेमळ, वैद्यकीय सेवा करण्याचे ध्येय असणारी आणि लहान वयातच मायेपासून अलिप्त राहून साधनेचा दृढ निर्धार करून साधना करणारी कु. वैदेही राजेंद्र शिंदे !

स्वातंत्र्य मिळालेल्या या राष्ट्राला आपल्याला आदर्श असे ईश्वरी राज्य बनवायचे आहे. त्यासाठी हा तुझा अन् माझा त्याग आहे. तुला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.