आनंदी, उत्साही आणि हसतमुख सौ. वृंदा वीरेंद्र मराठे !

कार्तिक शुक्ल तृतीया (२८.१०.२०२२) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा वीरेंद्र मराठे यांचा ५२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये काव्यरूपात पुढे दिली आहेत.

सौ. वृंदा वीरेंद्र मराठे

सौ. वृंदा वीरेंद्र मराठे यांना ५२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सतत आनंदी, उत्साही आणि हसतमुख ।
न कधी दुर्मुख ।।

अधिवक्ता योगेश जलतारे

लोकेषणेपासून सदा विन्मुख ।

निरंतर नवीन शिकण्या असती उत्सुक ।। १ ।।

असो बांधकामाचे नूतनीकरण ।
वा असो खाद्यपदार्थांचे नियोजन ।।

अथवा तपासणे असो ध्वनीचित्रीकरण ।
देवाने केले आहे त्यांचे नित्य प्रयोजन ।। २ ।।

दैनिकातील (टीप १) विज्ञापन संरचना असो ।
वा मोठी अल्पाहार सेवा असो ।।

वृंदाताईंच्या (टीप २) सेवेच्या गतीला नाही तोड ।
प्रत्येक सेवेला त्या देती भावाची जोड ।। ३ ।।

येती विविध समस्या जीवनात भलेही ।
आता नित्य सोपवती गुरूंच्या चरणी ।।

मग का न घेईल ती मायाळू गुरुमाई ।
आमच्या वृंदाताईंना तिच्या चरणी ।। ४ ।।

आता सोडूनी सर्व विचार ।
निरंतर रहावे निर्विचार ।।

समजून हे साधनेचे सार ।
अनुभवावी गुरुमाऊलीची कृपा अपार ।। ५ ।।

टीप १ : दैनिक ‘सनातन प्रभात’मधील
टीप २ : सौ. वृंदा वीरेंद्र मराठे

– श्री. योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक