ठाणे येथील संत पू. डॉ. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कार्याविषयी व्यक्त केलेला विश्‍वास !

नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर म्हणाले, ‘‘सनातन संस्था सध्याच्या काळाच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे कार्य करत आहे. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून आल्यावर ‘सनातन संस्थेविषयी प्रसारमाध्यमांनी जो अपप्रचार केला आहे, त्यात तीळमात्रही तथ्य नाही’, हे मला लोकांना सांगायचे आहे….

समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.

शिवरायांनी झोळीत टाकलेले राज्य परत करणारे आणि शिवराज्याभिषेकास अनुपस्थित राहून राजपुरोहित, राजगुरु होण्याचेही नाकारणारे अनासक्त, निरहंकारी समर्थ रामदासस्वामी !

समर्थांना सत्ताकारणाचा स्पर्शही झाला नव्हता. त्यांना स्फुरलेला राष्ट्रवादाचा विचार धर्मस्थापनेसाठी आणि न्यायनीती पुनर्स्थापित करण्यासाठी होता. सत्ताकारणात त्यांना रस असता, तर तेही शिवरायांचे अमात्य झाले असते.

कोटी कोटी प्रणाम !

• शेगाव येथील थोर संत श्री गजानन महाराज यांचा आज प्रकटदिन
• पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा आज वाढदिवस

साधकांवर प्रीती करणारे आणि ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्नरत असणारे प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक !

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अनंत कृपेमुळेच मला अनेक संतांचा सहवास लाभला. मला वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या या प्रीतीसाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर

‘ज्या मंदिरांमध्ये अधिक प्रमाणात अर्पण येत आहे, अशीच मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरांतून संतांना हटवून तेथे सरकारी अधिकारी आणले जात आहेत. आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे.

मथुरा येथील कथावाचक सुमेधा नंदजी महाराज यांना हिंदी भाषेतील सनातन पंचांग भेट

राधा नगरातील श्री राधेश्‍वर महादेव मंदिराच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी संत समागमास उपस्थित राहिलेले वृंदावन येथील कथावाचक श्री सुमेधा नंदजी महाराज यांची सनातनचे साधक श्री. राजीव भाटिया आणि साधिका विमल धमीजा यांनी भेट घेतली.

संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

संत एकनाथ महाराज यांची शिकवण जगभरात पोचवणार्‍या मिशनचे कार्य अभिनंदनीय आहे. सहस्रो भाविकांनी याचा लाभ करून घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. संतांची शिकवणच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी भाविकांनी याचा अधिकाधिक प्रसार करावा, हीच संतांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता होय.