समर्थांना सत्ताकारणाचा स्पर्शही झाला नव्हता. त्यांना स्फुरलेला राष्ट्रवादाचा विचार धर्मस्थापनेसाठी आणि न्यायनीती पुनर्स्थापित करण्यासाठी होता. सत्ताकारणात त्यांना रस असता, तर तेही शिवरायांचे अमात्य झाले असते. शिवरायांनी झोळीत टाकलेले राज्य स्वीकारून सिंहासनाधिष्ठित होऊ शकले असते. मात्र समर्थांनी राज्य तर परत केलेच; पण शिवराज्याभिषेकास अनुपस्थित राहून राजपुरोहित, राजगुरु होण्याचेही नाकारले. अनासक्त, निरहंकारी वृत्तीच केवळ हा चमत्कार घडवू शकते.’
– दादूमिया (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, मार्च २००९)