गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्या रस्त्याकडे वळवतात !
गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक
गंगेमुळे पाप, शशी (चंद्र) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात.
गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !
३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे.
गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक
गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.
देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !
सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणार्या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ?
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
‘गुरूंविषयी आपली खात्री जितकी दृढ तितकी प्रचीती खात्रीपूर्वक मिळते !’ – प.पू. भक्तराज महाराज
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक
गुरूंचा प्रश्न, इच्छा आणि आज्ञा एकत्र असते ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवीत नाहीत, तसे गुरुही दर्शवीत नाहीत.