‘बडगा’ रशियासाठी, झळ जगाला !

रशिया हा जगातील प्रमुख तेल पुरवठादार देश असून त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी तेल आणि वायू निर्यातीतून मिळणारे उत्पन्न हा प्रमुख आधार आहे. ‘प्राईस कॅपिंग’ घालून या देशाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे; पण उलट त्याची झळ अन्य जगाला बसण्याची शक्यता आहे.

शत्रूला कळायला हवे कोणतेही युद्ध नक्कीच संपते !  

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रनेसमवेतचे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की अमेरिकेच्या दौर्‍यानंतर पुतिन यांनी हे विधान केले आहे.

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनच्या ओडेशा शहरातील वीजपुरवठा खंडित !

‘वीज पुरवठा पूर्ववत् होण्यास अनेक दिवस लागण्याची शक्यता आहे’, असे युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की यांनी सांगितले आहे.

रशियाने आक्रमणात आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा

रशियाने युक्रेनमधील लीव्ह आणि खमेलनित्स्की या भागांत आक्रमण करतांना आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केला, असा दावा युक्रेनचे सैन्याधिकारी मायकोला डॅनिल्युक यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

युक्रेनमध्ये झेलेंस्की यांच्या विरोधात प्रथमच बंड !

मायकोलोव्ह आणि ओडेसा या शहरांत लोकांनी झेलेंस्की यांच्या विरोधात आंदोलने केली आहेत. ‘मार्शल लॉ’ लागू होण्याचा राजकीय लाभ झेलेंस्की घेत आहेत, असा लोकांचा आरोप आहे.

पाश्‍चात्त्य देशांनी भारताचे परराष्ट्र धोरण स्वीकारावे !

मी अन्य लोकांच्या (पाश्‍चात्त्य देशांच्या) मागण्यांनुसार परराष्ट्र धोरण आखत नाही. माझे परराष्ट्र धोरण हे माझा देश आणि माझे नागरिक यांच्या हितासाठी आहे.

पोलंडवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे २ जण ठार

रशियाचा शेजारी देश असलेल्या पोलंडमध्ये २ क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने २ जण ठार झाले. यामागे रशिया असल्याचा दावा केला जात असतांना रशियाने मात्र त्याने क्षेपणास्त्र डागले नसल्याचे सांगितले आहे. ‘आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत’, असे रशियाकडून सांगितले जात आहे.

रशियाच्या विरोधातील प्रस्तावाला भारतासह अनेक देशांचा विरोध

जी-२० शिखर परिषद

जर्मनीत महागाईदर १०.४ टक्क्यांच्या पलीकडे

गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये ऊर्जेशी संबंधित मूल्यात ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून नैसर्गिक वायूच्या मूल्यात दुप्पटीहून अधिक, म्हणजे १०९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

व्लादिमीर पुतिन ‘जी-२०’ शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत !

युक्रेनसमवेतच्या युद्धावरून पाश्‍चात्त्य देशांकडून होणारा निषेध टाळण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.