रशियाने आक्रमणात आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा

युक्रेनचे सैन्याधिकारी मायकोला डॅनिल्युक

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनमधील लीव्ह आणि खमेलनित्स्की या भागांत आक्रमण करतांना आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केला, असा दावा युक्रेनचे सैन्याधिकारी मायकोला डॅनिल्युक यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. या वेळी त्यांनी ‘एक्स-५५’ या क्रूझ क्षेपणास्त्रांंचे काही तुटलेले भागही पत्रकारांना दाखवले. ‘बीबीसी’ने हे वृत्त प्रसारित केले आहे. ‘आण्विक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून आक्रमण झाले, तर काही घंट्यांतच लाखो लोक मारले जातील’, असे युक्रेनच्या संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाने मात्र अद्याप युक्रेनच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजू गेल्या अनेक मासांपासून ड्रोनद्वारे आक्रमण करत आहेत. युक्रेनला अमेरिका आणि तुर्कीये या देशांकडून अत्यंत घातक असे ड्रोन विमान मिळाले आहे. या ड्रोन विमानांमुळे रशियाची मोठी हानी झाली आहे. इराणच्या ड्रोनच्या साहाय्याने रशियाने आता युक्रेनच्या विरोधात प्रभावी पाऊल उचलले आहे.